Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा ऐतिहासिक धमाका; 1.98 लाख कोटींचा विक्रमी नफा!
Public Sector Banks: सुधारित मालमत्ता गुणवत्ता, उत्तम कर्जपुरवठा आणि वाढलेले उत्पन्न यांमुळे 2025-26 दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात सुधारणा झाली. एकूण कार्यचालन नफा 3.21 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, तर एकूण निव्वळ नफा वार्षिक 11.1 टक्क्यांनी वाढून 1.98 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.

Public Sector Banks: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (पीएसबी) 2025-26 या आर्थिक वर्षात 1.98 लाख कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा नोंदवला असून, नफ्याचे हे सलग चौथे वर्ष आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले.
सुधारित मालमत्ता गुणवत्ता, उत्तम कर्जपुरवठा आणि वाढलेले उत्पन्न यांमुळे 2025-26 दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात सुधारणा झाली. एकूण कार्यचालन नफा 3.21 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, तर एकूण निव्वळ नफा वार्षिक 11.1 टक्क्यांनी वाढून 1.98 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.
31 मार्च 2026 रोजी या बँकांचा एकूण व्यवसाय 283.3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला असून, मागील वर्षाच्या तुलनेत 12.8 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एकूण ठेवी वार्षिक 10.6 टक्क्यांनी वाढून 156.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या. एकूण कर्जवाटपामध्ये वार्षिक 15.7 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून ते 127 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
2025-26 दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे, 31 मार्च 2026 रोजी एकूण अनुत्पादक मालमत्ता गुणोत्तर (नॉन-परफॉर्मिंग असेट्स) 1.93 टक्क्यांपर्यंत आणि निव्वळ अनुत्पादक मालमत्ता गुणोत्तर 0.39 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
निर्लेखित खात्यांमधून झालेल्या वसुलीसह एकूण वसुली 86,971 कोटी रुपये झाली आहे, जी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सुधारित वसुली यंत्रणा आणि उत्तम पतशिस्त दर्शवते.




