“अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल…”; रोहित पवारांना प्रत्युत्तर देत बोर्डीकरांचे ‘त्या’ व्हिडीओवर स्पष्टीकरण

Meghna Bordikar | राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा भर कार्यक्रमात ग्रामसेवकावर दमदाटी केल्याचा एक व्हिडीओ शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी शेअर केला. यात मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संताप व्यक्त करत ‘कानाखाली मारीन’ असं म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओवरुन सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
“रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतोय. पैशांची मागणी करतोय, त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या आणि मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले,” असल्याचे मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे. Meghna Bordikar |
मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण
“माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगीनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे. जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका. कृपया, अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्विट करणे बंद करा, पोलीस ठाण्यात जावून दादा्गिरी करण्यापेक्षा हे कधीही चांगल… जय जिजाऊ , जय अहिल्या , जय सावित्री,” असे ट्वीट मेघना बोर्डीकर यांनी केले. Meghna Bordikar |
मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगीनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रारी करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे.
जिल्ह्याची पालक या नात्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका…… https://t.co/EzUzBCgHq6— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) August 2, 2025
नेमकं प्रकरण काय?
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका कार्यक्रमात एका ग्रामसेवकाने महिलांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्या महिलांनी भर कार्यक्रमात मेघना बोर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर संतप्त झालेल्या बोर्डीकर यांनी त्या ग्रामसेवकाला खडसावलं. ‘असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन पगार कोण देते हा आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी” अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला होता. Meghna Bordikar |
रोहित पवार यांचे ट्विट
‘सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!’ असे आवाहन रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले. मात्र यावर आता मेघना बोर्डीकर यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. Meghna Bordikar |
हेही वाचा :
“भारतासोबत व्यापार युद्ध मोठी चूक…” ; कोणी दिला डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा? वाचा




