सातारा | समाजकल्याणच्या योजनांबद्दल होणार जनजागृती
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी असलेल्या योजनांबद्दल कलापथकांच्या माध्यमातून दि. 15 पर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी दिली.
या कलापथकांचे कार्यक्रम सातारा तालुक्यातील निगडी तर्फ सातारा, सैदापूर, कराड तालुक्यातील शेरे, कार्वे, पाटण तालुक्यातील म्हावशी, विहे, कोरेगाव तालुक्यातील तारगाव, बारेगाव, फलटण तालुक्यातील खामगाव, बरड, सस्तेवाडी, सुरवडी, खटाव तालुक्यातील कातरखटाव, निढळ, माण तालुक्यातील कुकुडवाड, शिंगणापूर, वाई तालुक्यातील उडतारे, आसले, खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक, जवळे, जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळा, इंदवली, सायगाव, महाबळेश्वर तालुक्यातील दुधगाव येथे होणार आहेत.





