पुणे जिल्हा : महाळुंगे पडवळ येथे आठवडे बाजारात जनजागृती

मंचर – आंबेगाव तालुकयातील महाळुंगे पडवळ या गावात आठवडे बाजारात जाऊन तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाचे वतीने मतदार जनजागृती करण्यात आली, अशी माहिती आंबेगाव मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांनी दिली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतअधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ, स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके यांच्या मार्गदर्शनाखाली अगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाळुंगे पडवळ गावात विशेष मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. आठवडे बाजारात आवटेमळा, सैदमळा, चासकरमळा, नांदूर, कडेवाडी, टाकेवाडी, महाळुंगे गावठाण, आनंदवाडी, पिंगळदरमळा, ठाकरवाडी गावातील व वाडी वस्तीवरील महिला व पुरुष मतदार बंधू भगिनी उपस्थित होते. आठवडे बाजार, चौक, बँक, पतसंस्था इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृती पोस्टर लावुन तहसील कार्यालय आंबेगाव स्वीप पथकाचे वतीने मतदार जनजागृती करण्यात आली.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची लगभग सुरू आहे त्यामुळे आंबेगाव विधानसभा स्वीप पथकाच्या वतीने तालुक्यातील60 टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या गावात जाऊन मतदान बंधू भगिनींना येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
मतदान जनजागृती पथकाच्या आवाहनाला शेतकरी, दुकानदार यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी आंबेगाव स्वीप नोडल अधिकारी सुनिल भेके सदस्य तुषार शिंदे, सुरेश रोंगटे, विनायक राऊत, नारायण गोरे, काशिनाथ घोंगडे, राहुल रहाटाडे, सचिन तोडकर, मंगेश जावळे, अशोक लोखंडे उपस्थित होते.
आम्ही सर्व शेतकरी मतदान करणारच असा संकल्प केला आहे. त्याचप्रमाणे गावातील जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करू.
-सुरेश सोलाट/किसन सैद, प्रगतशील शेतकरी





