सरकार पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार -उपमुख्यमंत्री
Updated On:

मुंबई : पोलिसांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्य शासन आवश्यक ती तरतूद करणार, पोलिसातील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत दिली.
वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता ‘शिवनेरी’, आरामगाड्यांच्या प्रवासाची परवानगी देण्याबाबत विचार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.





