Harshwardhan Sapkal: “पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवावे”; हर्षवर्धन सपकाळांचे फडणवीसांना चॅलेंज
Harshwardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री फडणविसांना प्रत्युत्तर

Harshwardhan Sapkal लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. ‘खरे तर महिला आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी आधी प्रियंका गांधी यांना संधी द्यायला हवी होती’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणविसांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवावं,’ असे थेट चॅलेंज त्यांनी फडणविसांना दिले आहे.
‘कौन राहुल?’ म्हणणाऱ्यांची अवस्था आता अशी झाली आहे की जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसत आहेत! ‘छात्रों की गुंज’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाची झोप उडाली आणि देवेंद्र फडणवीसांचा जळफळाट सुरू झाला आहे.
महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा डाव… pic.twitter.com/1UXQLCk5Nt
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) August 31, 2026
भाजपाची झोप उडाली
हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करत लिहिले की, ‘कौन राहुल?’ म्हणणाऱ्यांची अवस्था आता अशी झाली आहे की जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसत आहेत. ‘छात्रों की गुंज’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाची झोप उडाली आणि देवेंद्र फडणवीसांचा जळफळाट सुरू झाला आहे.
महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा डाव रचून देशाचे राजकीय गणित बदलण्याचा भाजपाचा मनसुबा काँग्रेसने हाणून पाडला, म्हणूनच फडणवीसांना एवढी मिरची झोंबली आहे. महिलांना संधी देण्याचा ढोंगी उपदेश करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवावे! आणि वंदे मातरमवर राजकारण करण्यापूर्वी RSS च्या शाखेत ते गायला सुरू करावे.
राहुल गांधींचा झंझावात थांबणार नाही
फडणवीस साहेब, खोट्याची कितीही फेकाफेक केली तरी राहुल गांधींचा झंझावात थांबणार नाही… जरा वास्तव स्वीकारा आणि स्वतःच्या राजकीय अस्वस्थतेवर उपचार करा, गेट वेल सून फडणवीस साहेब..!,” असा टोला सपकाळ यांनी लगावला. महिलांना स्था. स्व. संस्थेत ३३% आरक्षण काँग्रेसनेच दिले, महिला आरक्षण २०२३ मध्येच मंजूर, विरोध आहे तो देशाचे तुकडे पाडणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:





