Rahul Gandhi: “राहुल गांधीच असतील देशाचे पुढील पंतप्रधान”, तामिळनाडूतील मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Rahul Gandhi: टीव्हीकेने पाठिंबा न दिल्यास दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा

Rahul Gandhi: तामिळनाडूचे मंत्री एस. राजेश कुमार यांनी काँग्रेस आणि तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) यांच्यातील युतीबाबत एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जर टीव्हीकेने २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारले नाही, तर काँग्रेसचे दोन्ही मंत्री राज्य मंत्रिमंडळातून राजीनामा देतील.
कन्याकुमारी येथे एका कार्यक्रमात बोलताना राजेश कुमार म्हणाले की, काँग्रेस २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देईल. त्यामुळे राहुल गांधी देशाचे पुढील पंतप्रधान होतील. या मुद्द्यावर काँग्रेस आपल्या भूमिकेशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
TVK चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या नावाचीही पंतप्रधानपदासाठी चर्चा
राजेश कुमार यांच्यासोबत, उच्च शिक्षण मंत्री पी. विश्वनाथन हे देखील तामिळनाडू सरकारमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. तामिळनाडूतील सत्ताधारी आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ अर्थात टीव्हीकेचे अनेक मंत्री, आमदार आणि नेते, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सी. विजयन यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्याची मागणी करत आहेत.
Kanyakumari, Tamil Nadu Minister Rajesh Kumar says, “Rahul Gandhi will be the Prime Minister of India in 2029. If the Tamilaga Vettri Kazhagam (TVK) says it does not agree with this, the two Congress ministers in the TVK Cabinet will resign from their posts…” (30.08) pic.twitter.com/JGYDhrlZCf
— ANI (@ANI) August 31, 2026
दरम्यान, राजेश कुमार यांचे वक्तव्य हे काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यातील वाढत्या मतभेदांचे लक्षण मानले जात आहे. जर मित्रपक्षाने राहुल गांधींच्या उमेदवारीला पाठिंबा दिला नाही, तर ते आणि पी. विश्वनाथन आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत.
मे महिन्यात, काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीके-प्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यानंतर, काँग्रेसला राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात आले.
आता, राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर काँग्रेसने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे दोन्ही पक्षांमधील आघाडीच्या राजकारणासमोर एक नवीन आव्हान उभे राहू शकते.
हेही वाचा:





