उवसग्गहरं स्तोत्र पठणामुळे सुखसमृद्धी

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -उवसग्गहरं स्तोत्र पठणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शत्रु आदी सांसारिक दुःखपिडा दूर होतात व मनुष्य प्राणिमात्रामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते, असे मत आरएमडी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांनी व्यक्त केले.
बिबवेवाडी येथे श्री रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्थानक भवन येथे आयोजित केलेल्या सामूहिक उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.
उवसग्गहरं स्तोत्र आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. पूज्य उपप्रवर्तिनी महासती सुमित्राजी म. सा. आदिठाणा पाच यांच्या पावन सान्निध्यात व प. पू. दिनेश मुनीजी म. सा., प. पू. दिव्यताश्रीजी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संप्रज्ञाजी महाराज यांनी माणिकचंद ग्रुपचे संस्थापक श्री रसिकलाल धारिवाल यांच्या समाजसेवेतील विविध कार्याचा उलगडा उपस्थितांना करून दिला, तर आरएमडी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन यांनी तरुण वयातच आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे पोपटशेठ ओसवाल आणि पदाधिकारी, इंद्राणी बालन फाउंडेशन व बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, समाजातील विविध मान्यवर, उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक शोभाताई धारिवाल यांनी केले. माणिकजी दुगड यांनी आभार मानले.





