BJP Leader : ऐन दिवाळीत भाजपच्या बड्या नेत्याचं निधन; राजकारणात शोककळा
BJP Leader : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी मंडळ अध्यक्ष छोटेलाल पासवान (वय ५८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

BJP Leader : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेले भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष छोटेलाल पासवान (वय ५८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. ( BJP Leader)
हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल प्रकरणात झाली होती शिक्षा
छोटेलाल पासवान हे गोरखपूर जिल्ह्यातील खोराबार गावचे रहिवासी होते. त्यांनी भाजपचे खोराबार मंडळ अध्यक्ष तसेच प्रधान संघाचे मंडळ अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. २००४ मध्ये दाखल झालेल्या हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगल घडवण्याच्या प्रकरणात न्यायालयाने २५ जुलै २०२४ रोजी त्यांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी गोरखपूर जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. ( BJP Leader)
प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी छोटेलाल पासवान यांची प्रकृती खालावली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. ( BJP Leader)
कारागृह प्रशासनाची माहिती काय?
कारागृह अधीक्षक दिलीप पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटेलाल पासवान यांची कारागृहात येण्यापूर्वीपासूनच प्रकृती ठीक नव्हती. १ नोव्हेंबर रोजी प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ( BJP Leader)
BJP Leader : महाराष्ट्र हादरला..! भाजपच्या बड्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या;राजकीय वर्तुळात खळबळ





