BJP Leader : महाराष्ट्र हादरला..! भाजपच्या बड्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या;राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Leader : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

BJP Leader : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तिप्पेहळ्ळी परिसरात त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप करचे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. (BJP Leader)
कारमधून प्रवास करताना गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापसिंह करचे हे २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहनातून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेले संशयित आरोपी हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे यांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. (BJP Leader)
या गोळीबारात करचे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सांगोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. (BJP Leader)
शिंदे सेनेच्या नेत्यांवर कट रचल्याचा आरोप
प्रतापसिंह करचे यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी या हत्येमागे मोठा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. आटपाडी येथील शिंदे सेनेचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप करचे कुटुंबीयांनी केला आहे. (BJP Leader)
या संदर्भात कुटुंबीयांनी सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी आणि त्यामागील तथ्य तपासातून स्पष्ट होणार आहेत. (BJP Leader)
‘आम्हाला तात्काळ न्याय मिळावा’
भाजप कार्यकर्त्याच्या हत्येमुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. “राज्यात भाजपचे सरकार असतानाही एका भाजप कार्यकर्त्याची अशी हत्या होत असेल, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल अर्चना करचे यांनी उपस्थित केला आहे. (BJP Leader)
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या हत्येचा तपास सुरू असून, आरोपांची सत्यता आणि हत्येमागील नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. (BJP Leader)
BJP Leader : भाजपला मोठा धक्का..! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ





