Satara: कॉ. शेख काका व डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी उद्या कार्यक्रम
Satara परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व राष्ट्रीयता जागर अभियान यांच्यावतीने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

Satara: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख बंडू इनामदार उर्फ कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजता येथे स्मृती व्याख्यानाचा व अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती व राष्ट्रीयता जागर अभियान यांच्यावतीने येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. दिल्ली येथील जंतर मंतर येथील विद्यार्थी युवक आंदोलनातील सहभागी युवकांची मनोगते यावेळी सादर केली जाणार आहेत. जेन झी आंदोलनाची नवी राजकीय भाषा आणि पुढील दिशा या विषयावर एआयएसएफच्या जिल्हा संयोजक श्रावणी बुवा तसेच वैभव चोपकर यांचा यामध्ये सहभाग आहे. हे दोघेही जंतर मंतरवरील आंदोलनातील सहभागी कार्यकर्ते आहेत. या कार्यक्रमाला विशेषतः युवक युवतींनी बहुसंख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.





