वाघोली परिसरातील पाणीपुरवठ्यात अडचणी
Updated On:

वाघोली : परिसराला पाणी पुरवठा होणाऱ्या वढू खुर्द (ता. हवेली) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याचे ढापे पाटबंधारे विभागाकडून काढण्यात आले आहेत. ढापे काढल्याने नदीची पाणी पातळी खालावली असल्याने वाघोली पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने चालत नाही, त्यामुळे पुढील काही दिवस वाघोलीत पाणीटंचाई जाणवणार आहे.
वाघोलीत कमी क्षमतेने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. वढू येथे पाणी पातळी खालावली असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.





