बहुधा, मोदींना ‘इंडिया’ नाव आवडलयं – ममता बॅनर्जी
Updated On:

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर नावावरून टीका केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपहासात्मक शैलीत प्रतिक्रिया दिली. मी पंतप्रधानांचे आभार मानते.
बहुधा, त्यांना इंडिया नाव आवडलयं. त्या नावाचा सामान्य जनतेप्रमाणेच पंतप्रधानांनीही स्वीकार केलेला दिसतो. भाजपचे नेते विरोधक आघाडीच्या नावाविषयी जितके वाईट बोलतील; तितके त्यांना ते आवडल्याचे सिद्ध होत जाईल, असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
कॉंग्रेस, ममतांच्या तृणमूल कॉंग्रेससह 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत देशव्यापी आघाडी स्थापन केली. त्या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आले. ते नाव सुचवण्यात ममतांचेही योगदान असल्याचे समजते.





