FIH Pro League 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर, 24 सदस्यीय सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघ आगामी FIH प्रो लीग सामन्यात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. उत्तराखंडच्या वंदना कटारियाने दुखापतीतून सावरल्यानंतर उपकर्णधार म्हणून संघात पुनरागमन केले आहे. या दुखापतीमुळे ती या महिन्याच्या सुरुवातीला रांची येथे ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळू शकली नव्हती.
रांचीमध्ये भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्याची संधी गमवावी लागली. तर भारतीय संघ शेवटच्या दोन ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.
प्रो लीगचा भुवनेश्वर लेग(टप्पा) 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान तर राउरकेला लेग (टप्पा) 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होईल. दोन्ही टप्प्यामध्ये भारताचा सामना अमेरिका, नेदरलँड्स, चीन आणि ऑस्ट्रेलियाशी प्रत्येकी दोनदा होणार आहे. भारतीय संघ 3 फेब्रुवारीला विद्यमान एशियाड चॅम्पियन चीनविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
भारतीय महिला हाॅकी संघ –
गोलरक्षक (Goalkeepers) : सविता (कर्णधार), बिचू देवी खरीबम.
बचावपटू (Defenders) : गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका, ज्योती छत्री.
मिडफिल्डर (Midfielder) : निशा, वैष्णवी विठ्ठल फाळके, नेहा, नवनीत कौर, सलीमा टेटे, सोनिका, ज्योती, बलजीत कौर, सुनीलिता टोप्पो.
फॉरवर्ड (forward) : मुमताज खान, ब्यूटी डुंगडुंग, लालरेमसियामी, संगीता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया (उपकर्णधार), शर्मिला देवी.