Pro Kabaddi League 2024 : गतविजेत्या पुणेरी पलटणचा सलग दुसरा विजय, पटना पायरेट्सचा केला दारूण पराभव…

Pro Kabaddi League 2024 (Puneri Paltan vs Patna Pirates) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील आठवा सामना पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्स यांच्यात झाला. या सामन्यात पुणेरी पलटण संघाने तीन वेळा विजेत्या पाटणा पायरेट्सचा 40-25 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
एक दोन तीन चार… पुणेरी पलटनचा जयजयकार! ✊🧡
पुण्याचं पाणी आहे ते, जिंकल्याशिवाय राहणारच नाही! 💪🫶#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #PatnaPirates pic.twitter.com/ZgdiHsTArj
— ProKabaddi (@ProKabaddi) October 21, 2024
यासह पुणेरी पलटणने चमकदार कामगिरी करत यंदाच्या मोसमात सलग दुसरा विजय संपादन केला. या सामन्यात गतविजेत्या पुणेरी पलटणने पटना पायरेट्सचा 15 गुणांच्या फरकाने पराभव केला.
वरवर पाहता, पुणेरीने या मोसमात चांगली सुरुवात केली आहे. या सामन्यात पुणेरी पलटणसाठी कर्णधार अस्लम इनामदारने सर्वाधिक 9 गुण मिळवले. दरम्यान, अमन आणि गौरवने हाय-फाइव्ह दिले. पाटणासाठी देवांक आणि अंकितने सर्वाधिक 6 गुण मिळवले.





