Pro Kabaddi League 2024 : प्रदीप नरवालच्या संघाचा सलग दुसरा पराभव, रेकॉर्डब्रेक कामगिरी गेली व्यर्थ…

Pro Kabaddi League 2024 (Gujarat Giants vs Bengaluru Bulls) : प्रो कबड्डी लीगच्या या मोसमातील सहावा सामना गुजरात जायंट्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सने बेंगळुरू बुल्सचा 36-32 असा पराभव केला. अशाप्रकारे बेंगळुरू बुल्सला मोसमातील दुसरा पराभव पत्करावा लागला.
𝙂𝙪𝙟𝙖𝙧𝙖𝙩, 𝙩𝙖𝙖𝙧𝙞 𝙬𝙞𝙣 𝙠𝙖𝙢𝙖𝙖𝙡 𝙘𝙝𝙝𝙚 👏
Get all the LIVE updates 👉 https://t.co/cfORnV9MAP or download the Pro Kabaddi Official App 📱#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #GujaratGiants #BengaluruBulls pic.twitter.com/ejZC1Zef7x
— ProKabaddi (@ProKabaddi) October 20, 2024
सोंबीरने गुजरातच्या बचावात चमकदार कामगिरी केली आणि 6 टॅकल पॉइंट घेतले. बेंगळुरू बुल्ससाठी प्रतीक दहियाने सर्वाधिक 8 गुण घेतले, तर प्रदीप नरवालने 9 गुण घेतले आणि सौरभ नांदलने 3 गुण घेतले, परंतु संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
Pro Kabaddi League 2024 : रोमहर्षक लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा बंगाल वॉरियर्सवर विजय…
बेंगळुरू बुल्सचा अनुभवी रेडर प्रदीप नरवालनेही पहिल्या हाफपूर्वी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने PKL इतिहासात त्याचे 1700 रेड्स पाॅईट्स (1700 raid points) पूर्ण केले.





