Pro Kabaddi 2024 : – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 87 व्या सामन्यात दबंग दिल्लीने तमिळ थलायवाजचा 32-21 अशा फरकाने पराभव केला. दबंग दिल्लीसाठी या सामन्यात नवीन कुमारने शानदार प्रदर्शन दाखवताना सुपर-10 लगावला तर थलायवाजसाठी मोईन शफागीने सर्वाधिक आठ गुणांची कमाई केली. या विजयानंतर दबंग दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोचली असून थलायवाज संघावर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे.
दिल्ली के दबंग छोरों ने किया दमदार परफॉर्मेंस 💪🔥
थलाइवाज़ को दी करारी शिकस्त 🤯#ProKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #LetsKabaddi #TamilThalaivas #DabangDelhiKC pic.twitter.com/9EEgS8FIp9
— ProKabaddi (@ProKabaddi) December 1, 2024
या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये कमालीची टक्कर पाहायला मिळाली तमिळ थलायवाजच्या सचिन तन्वपने सुरुवातीला रेड घेताना संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याच्यासह मोहित शफागे सातत्याने संघासाठी गुण मिळवत राहिला तर दुसरीकडे दबंग दिल्लीच्या नवीन कुमारने जबरदस्त पद्धतीने रेट टाकून संघाचे पुनरागमन करवले. पहिल्या सत्रात दोन्ही संघ 12-12 अशा गुणांनी बरोबरीत होते.
दुसऱ्या सत्रात मात्र थलायवाज गुण मिळवण्यासाठी चाचपडत राहिली तर दुसरीकडे दिल्लीने गुणांचा सपाटा चालूच ठेवला. अखेर थलायवाज सामन्याच्या शेवटी ऑल आऊट झाली. त्याचा फायदा दबंग दिल्लीला विजय मिळवण्यात झाला.
पटणा बंगालवर भारी
Pirates get the better of Warriorz in an epic panga 🔥
No prizes for guessing who was their hero again 😎#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #PatnaPirates pic.twitter.com/ZY8HAtgUnV
— ProKabaddi (@ProKabaddi) December 1, 2024
रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पटणा पायरेट संघाने बंगाल वॉरियर्सचा 38-35 अशा फरकाने पराभव केला. पटणा पायरेटसाठी देवांक याने सर्वाधिक 13 गुणांची कमाई केली. त्याच्यासह आयान याने 8 गुण कमावले तर बंगाल वारियर कडून मनिंदर सिंग यांने एकूण 11 गुणांची कमाई केली. या विजयासह पटणा पायरेट संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर तर बंगालचा संघ अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.