Pro Kabaddi League 2023 : सलामीला गुजरात ठरली ‘जायंट्स’; तेलुगू टायटन्सचा केल पराभूत…

अहमदाबाद – प्रो कबड्डी लीगच्या १० व्या हंगामातील (Pro Kabaddi League 2023) पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सचा ३८-३२ असा पराभव केला. गुजरातच्या (Gujarat Giants vs Telugu Titans) विजयात सोनूने (११ गुण) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याने सुपर-१०चा जबरदस्त फटकाही मारला. गुजरातच्या विजयामुळे पवन सेहरावतचा सुपर -१० व्यर्थ गेला.
The Giants start the BLOCKBUSTER #PKLSeason10 with a win 🤩
Score at full-time 👉 38-32
Stay tuned for the second match. Watch it LIVE on the Star Sports Channel and for free on the Disney+Hotstar mobile app 📲#GGvTT #ProKabaddi #HarSaansMeinKabaddi pic.twitter.com/HjLxvbPgF6
— ProKabaddi (@ProKabaddi) December 2, 2023
यंदाच्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात सुपर १० मारून पवनने त्याच्या कारकिर्दीतील ५० वा सुपर-१० पूर्ण केला. यासह अशी कामगिरी करणारा तो चौथा रेडर ठरला. मात्र, त्याची कामगिरी संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी ठरली नाही. पहिल्या हाफनंतर तेलुगू टायटन्सने १६-१३ अशी आघाडी घेतली. पवनने पहिली चढाई केली आणि बोनसद्वारे गुण मिळवले त्यानंतर त्याने टच पॉइंटही मिळवला. तर गुजरातला पहिला गुण रोहित गुलियाने मिळवून दिला.
दोन्ही संघांचे चढाईपटू सतत गुण मिळवत होते आणि बचाव दडपणाखाली दिसत होता. दरम्यान, ४१व्या मिनिटाला फजेल अत्राचलीने पवनला टॅकल करत सामन्यातील आपले खाते उघडले. यानंतर, सामन्याचा वेग मंदावला आणि दोन्ही संघांनी ‘करो या मरो’च्या चढाईवर खेळण्यास सुरुवात केली. ३८व्या मिनिटाला तेलुगू टायटन्स संघाने शेवटी दुसऱ्यांदा ऑलआऊट झाला आणि सामना त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेला. शेवटी गुजरातने सामना सहज जिंकला आणि तेलुगू टायटन्सने पराभवाचे अंतर ७ च्या खाली ठेवत सामन्यातून एक गुण घेतला.
सोनूची निर्णायक चढाई
सोनूने उत्तरार्धात पहिली चढाई करताना जबरदस्त सुपर रेडसह टायटन्सचे एक दोन नव्हे तर तब्बल ५ खेळाडू बाद केले. यासह, त्याने आपल्या संघातील लोनाचा धोका तर टाळलाच पण तेलुगू टायटन्सला ऑलआऊटच्या दिशेने ढकलले. या सुपर रेडनंतर तेलुगू संघ पूर्णपणे विस्कळीत झाला. एकीकडे त्यांचा बचाव सोनूला रोखू शकला नाही तर रेडर्सही गुण मिळवण्यात अपयशी ठरले. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.





