Pro Kabaddi 2024 (UP Yoddhas vs U Mumba) :- अफलातून पकडी, सर्वोत्तम चढाया असेच वर्ण? युपी योद्धा व यु मुम्बा यांच्यातील लढतीचे करावे लागेल. प्रो-कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील हा 45 वा सामना अखेर अत्यंत सनसनाटीपणे यु मुम्बाने 35 विरुद्ध 33 असा अवघ्या 2 गुणांनी जिंकला.
#UMumba चे छावे म्हणजे जिंकून दाखवणारे 💪#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #UPYoddhas pic.twitter.com/98Syt66WpA
— ProKabaddi (@ProKabaddi) November 10, 2024
या सामन्यात रोहित राघव हा संघासाठी सर्वात मोठा स्टार होता, त्याने शेवटच्या काही मिनिटांत दमदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. त्याने एकूण 8 गुण घेतले. दुसरीकडे यूपीसाठी भरतने सर्वाधिक 11 गुण घेतले पण त्याच्या बचावपटूंनी खूप चुका केल्या आणि त्याचे परिणाम संघाला भोगावे लागले.
सामन्याच्या अर्धवेळेपर्यंत युपी योद्धाकडे आघाडी होती. त्यानंतर मात्र, यु मुम्बाने खेळ उंचावला व सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना बरोबरी साधली. त्यानंतर एकेर गुण मिळवताना त्यांनी युपी संघावर दडपण राखले. यु मुम्बाच्या अजीत व रिंकू यांनी मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम पकडी केल्या.
Pro Kabaddi 2024 : तेलगू टायटन्सचा रोमहर्षक विजय, पुणेरी पलटणला 1 गुणानं केलं पराभूत…
त्यांच्या वर्चस्वसमोर युपी योद्धाचा संघ नवखा वाटत होता. त्यांनी प्रतिकार केला मात्र, त्यांच्या भऱतच्या 11 गुणांचा वाटा वगळता त्यांच्या अन्य खेळाडूंना यश आले नाही. त्यांना अखेरच्या महत्वाच्या तीन मिनिटांत यु मुम्बाचा बचाव भेदताच आला नाही व तीथेच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. मुम्बाच्या विजयात सुनील कुमारचाही मोठा वाटा होता. त्याने मोक्याच्या क्षणी अफलातून पकडी केल्या व युपीविरुद्ध महत्वाचे गुण मिळवून दिले.