Pro Kabaddi 2024 : बेंगळुरू बुल्सचा एका गुणानं पराभव, अतितटीच्या लढतीत यू-मुम्बानं मारली बाजी…

Pro Kabaddi 2024 (Bengaluru Bulls vs U-Mumba) : प्रो कबड्डी लीगच्या या हंगामात बेंगळुरू बुल्सचे नशीब खराब आहे असे दिसते. कारण यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात बेंगळुरू बुल्सला फक्त एका गुणाच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत रोमांच कायम होता.
मुंबईला सवय आहे अटीतटीने खेळायची आणि जिंकायची 🧡
सातवा विजय आणि पॉईंट टेबलवर दुसरा नंबर ✌️#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #UMumba pic.twitter.com/FOKiKsVTQl
— ProKabaddi (@ProKabaddi) November 18, 2024
वास्तविक, प्रो कबड्डी लीगच्या 62 व्या सामन्यात यू मुम्बाने बेंगळुरू बुल्सचा 38-37 असा पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. यासह मुंबईने त्यांच्या 7व्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असून बेंगळुरू बुल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. ते अजूनही 11व्या स्थानावर आहेत.
प्रो कबड्डी 2024 चा हा रोमांचक सामना यू मुम्बाने जिंकला आणि बुल्सला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. पहिल्या हाफमध्ये बुल्सच्या कमकुवत बचावामुळे मुंबाला 10 बोनस गुण घेता आले आणि ही चूक त्यांना शेवटी महागात पडली. परदीप नरवालने बेंगळुरू बुल्ससाठी चढाई करताना सर्वाधिक 10 रेड पॉइंट घेतले आणि नितीनने बचावात 6 टॅकल पॉइंट घेतले. तर दुसरीकडे अजित चौहाननेही मुंबासाठी चढाई करताना 10 गुण मिळवले. त्याच्याशिवाय मनजीतनेही 9 गुण मिळवले.





