Pro Kabaddi 2024 : पुणेरी पलटणचा बंगाल वॉरियर्सवर एकतर्फी विजय….

Pro Kabaddi 2024 (Puneri Paltan vs Bengal Warriorz) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 73 व्या सामन्यात गतविजेत्या पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सचा 51-34 असा एकतर्फी पराभव केला.
कोण म्हणतं जिंकणार नाय, जिंकल्याशिवाय राहणार नाय! 💪🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #BengalWarriorz pic.twitter.com/HxxDBF6eEi
— ProKabaddi (@ProKabaddi) November 24, 2024
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये पुणेरी संघाने वर्चस्व राखताना चपळाईने खेळ केला. त्यांनी बंगाल संघाच्या चालींवर कुरघोडी करताना पहिला हाफ संपला तेव्हा 24-11 अशी भक्कम आघाडी घेतली होती. दुसरा हाफ सुरु झाल्यानंतरही पुणेरी संघाचा धडाका कायम होता. त्यांच्या सर्वच खेळाडूंनी बंगाल संघावर वर्चस्व राखले. पुणेरी संघाने गुणांचे अर्धशतकही पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अफलातून चढाया केल्या व भक्कम बचाव करत विजय साकारला.
बंगाल वॉरियर्ससाठी, फक्त नितीनने या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि 13 गुण मिळवले. तर पुणेरी पलटणसाठी आकाश शिंदे आणि मोहित गोयत यांनी रेडिंग मध्ये (चढाया) उत्कृष्ट कामगिरी केली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 9-9 गुण घेतले.





