Pro Kabaddi 2024 (Match 120) | पाटणा पायरेट्स प्ले-ऑफसाठी ठरले पात्र, तेलुगू टायटन्सवर केली मात…

Pro Kabaddi 2024 (Patna Pirates vs Telugu Titans) : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 120 व्या सामन्यात पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा 41-37 असा पराभव करत जबरदस्त विजय नोंदवला. या सामन्यासह पाटणा पायरेट्स प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत तर तेलुगू टायटन्सला अंतिम 6 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
The Pirates board the Playoffs ship in style 🤩🏴☠️#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PatnaPirates #TeluguTitans pic.twitter.com/PPHWZgGOi6
— ProKabaddi (@ProKabaddi) December 18, 2024
पाटणा पायरेट्ससाठी देवांकने सुपर 10 आणि दीपक-अंकितने हाय 5 पूर्ण केले. तेलुगू टायटन्ससाठी पवनने सर्वाधिक 9 गुण घेतले. पवनने या सामन्याव्दारे 1300 रेड पॉइंट पूर्ण केले.
दरम्यान, 18 डिसेंबर रोजी प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 119 वा आणि 120 वा सामना खेळला गेला. यामध्ये तमिळ थलैवाजने एकतर्फी लढतीत बंगाल वॉरियर्सचा तर पाटणा पायरेट्सने तेलुगू टायटन्सचा पराभव केला. या सामन्यासह पाटणा 73 गुणांसह आणि यूपी योद्धा 69 गुणासह प्ले-आॅफसाठी पात्र ठरले आहेत.
Pro Kabaddi 2024 (Match 119) | तमिळ थलैवाजविरूध्द बंगाल वॉरियर्सचा लाजीरवाणा पराभव….
याआधी, हरियाणा स्टीलर्स 79 गुणांसह आणि दंबग दिल्ली केसी 71 गुणांसह आधीच प्ले-आॅफसाठी पात्र ठरले असून आणखी दोन संघ प्ले-आॅफसाठी पात्र ठरणे बाकी आहेत.





