प्रियांका गांधी वायनाडचा गड राखणार? कशी असणार काँग्रेसची रणनीती ?

Priyanka Gandhi Vadra | लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली. या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने या ठिकाणी प्रियांका गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानिमित्त काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूकीत पदार्पण करणार आहेत. प्रियंका गांधी यांची एन्ट्री हा काँग्रेसच्या राजकारणातील नवा अध्याय आहे.
काँग्रेसकडून हा केवळ दक्षिण आणि उत्तरेचा समतोल साधण्याचा प्रयत्न नाही, तर गांधी घराण्याची काँग्रेसवरील पकड मजबूत करण्याचाही प्रयत्न आहे. वायनाडमधून प्रियंका गांधी यांचा विजय झाला तर नेहरू-गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल. राहुल आणि प्रियांका यांच्या आई सोनिया गांधी राज्यसभेच्या सदस्य आहेत.
प्रियांका गांधी यांचा राजकीय प्रवास Priyanka Gandhi Vadra |
प्रियांका गांधी 1999 पासून राजकारणात सक्रिय आहे, मात्र त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला त्यांनी आईसाठी आणि नंतर भावासाठीही प्रचार केला. त्यांची वाढती लोकप्रियता पाहता पक्षाने जानेवारी 2019 मध्ये प्रियांका यांना काँग्रेसच्या सरचिटणीस बनवले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका यांनी यूपीमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. प्रियंका यांनी 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीचे नेतृत्व केले.
प्रियांका काँग्रेस नेतृत्व आणि रणनीती बनवणाऱ्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रियांका गांधी यांनी यूपी व्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये पक्षाची निवडणूक तयारीसाठी मोठा सहभाग घेतला होता. परंतु दक्षिणेतील राजकीय मैदानात उतरण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
काँग्रेसची रणनिती Priyanka Gandhi Vadra |
वायनाडमधून प्रियंका गांधी यांची उमेदवारी केरळमधील काँग्रेस पक्षाच्या योजनांशी जोडलेली आहे. उत्तरेत भाजपचा आवाज आहे, तर दक्षिणेत परिस्थिती उलट आहे. दक्षिणेतील तीन राज्यांमध्ये काँग्रेस आधीच सत्तेत आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पक्षाची सत्ता आहे आणि तामिळनाडूवर त्यांचा मित्रपक्ष द्रमुकचे राज्य आहे.
वायनाडमधून प्रियंकाच्या प्रवेशामुळे गांधी कुटुंबाला उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला वाटते. काँग्रेस हायकमांड कदाचित प्रियंकाला केरळमध्ये सर्वात मोठी हमी म्हणून पाहत आहे. याचा अर्थ असाही होतो की 2026 मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करतील.
याशिवाय केरळ काँग्रेसला सत्ताधारी पिनाराई विजयन सरकारविरोधात जनमताचा कौल असून लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा विश्वास आहे. परंतु या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ सोडून देण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक या मुद्द्याचे भांडवल करण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, राहुल गांधींना दोन वेळा लोकसभेत पाठवणारा वायनाड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. त्यामुळेच या जागेवरुन प्रियांका गांधी यांना काँग्रेसने उतरवल्याचेही म्हंटले जात आहे. Priyanka Gandhi Vadra |
हेही वाचा:





