पॅलेस्टाईननंतर आता बांगलादेशी हिंदूंना प्रियांका गांधींचा पाठिंबा ; ‘ती’ खास बॅग घेऊन संसदेत दाखल

Priyanka Gandhi supports Bangladeshi Hindu । काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी संसदेत बॅग पॉलिटिक्स सुरु केल्याचे दिसून येत आहे. कारण कालच त्यांनी पॅलेस्टाईनच्या लोकांप्रती समर्थन आणि एकता दर्शवणारी एक हँडबॅग घेऊन संसदेत प्रवेश केला होता . त्यानंतर आज पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांना पाठिंबा देणारी पिशवी घेऊन संसदेत पोहोचल्या.
भाजपच्या टीकेला प्रियांका गांधींचे उत्तर Priyanka Gandhi supports Bangladeshi Hindu ।
प्रियंका गांधी यांनी एक दिवस अगोदर पॅलेस्टाईनला पाठिंबा देणारी बॅग घेऊन संसदेत दाखल झाल्या होत्या. ज्याला भाजपने तीव्र विरोध केला. विरोध करताना भाजपने प्रियांका आणि काँग्रेसला बांगलादेशातील हिंदूंचे दुःख दिसत नसल्याचे म्हटले. भाजपच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधी यांनी आज खास बॅग घेऊन आल्या होत्या. या बॅगेवर ‘बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे रहा.’ असे लिहिले आहे.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी काल पॅलेस्टाईनच्या लोकांप्रती समर्थन आणि एकता दर्शवणारी एक हँडबॅग घेऊन संसदेत दाखल झाल्या होत्या. प्रियंका गांधींच्या या पिशवीवर ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेले होते आणि पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या टरबूजसारखे पॅलेस्टिनी चिन्हही होते. टरबूज हा पॅलेस्टिनी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. अर्धे कापलेले टरबूजाचे चित्र आणि इमोजी बहुतेकदा पॅलेस्टाईनच्या लोकांशी एकता दाखवण्यासाठी वापरतात.
संबित पात्रा यांनी निशाणा साधला होता Priyanka Gandhi supports Bangladeshi Hindu ।
प्रियंका गांधी यांची पॅलेस्टाईन बॅग भाजप नेते आणि खासदार संबित पात्रा यांनी सांगितले की, गांधी घराणे नेहमीच तुष्टीकरणाची पिशवी घेऊन आले आहे आणि निवडणुकीतील त्यांच्या पराभवाचे कारण तुष्टीकरणाची पिशवी आहे. अलीकडेच, नवी दिल्लीतील पॅलेस्टाईन दूतावासाचे प्रभारी आबेद एलराजेग अबू जझर यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली आणि नुकत्याच झालेल्या वायनाड निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. जूनमध्ये प्रियंका गांधी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका केली आणि गाझामधील इस्रायली सरकारच्या कृतींचे वर्णन “नरसंहार” केले.





