‘रक्षाबंधन’च्या दिवशी प्रियांका गांधींनी शेअर केला राहुल यांच्या बरोबरच्या भावनिक फोटो

Priyanka Gandhi | Rahul Gandhi : रक्षाबंधना निमित्त कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांचे बंधु राहुल गांधी यांचे काही भावनिक फोटोंचा कोलाज शेअर केला. भाऊ आणि बहिणी संघर्षात भागीदार असतात आणि आठवणीमध्ये सोबती असतात, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी ‘रक्षा बंधन’च्या दिवशी एक्सवरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.
भाई-बहन का रिश्ता उस फुलवारी की तरह होता है जिसमें सम्मान, प्रेम और आपसी समझदारी की बुनियाद पर अलग-अलग रंगों वाली यादें, संग के किस्से-कहानियाँ व दोस्ती को और गहरा करने का संकल्प फलता-फूलता है।
भाई-बहन संघर्ष के साथी होते हैं, स्मृतियों के हमराही भी और संगवारी के खेवैया भी।… pic.twitter.com/4zkX1rISrN
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 19, 2024
त्यांनी म्हटले आहे की, भाऊ आणि बहिणीचे नाते हे फुलांच्या बागेसारखे असते ज्यामध्ये आदर, प्रेम आणि परस्पर समंजसपणा, वेगवेगळ्या रंगांच्या आठवणी, एकजुटीच्या कहाण्या आणि मैत्री अधिक दृढ करण्याचा संकल्प फुलतो असेही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांनीही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की भाऊ आणि बहिणींमधील अतूट प्रेम आणि आपुलकीचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या सर्व देशातील जनतेला खूप खूप शुभेच्छा. संरक्षणाचा हा धागा सदैव नाते घट्ट करणारा राहो असेही त्यांनी म्हटले आहे.





