“खरा भारतीय कोण आहे हे…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रियंका गांधींचे भाष्य

Priyanka Gandhi on Central Government। संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी एक विधान केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या, “माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करून, मी हे सांगू इच्छिते की ते खरे भारतीय कोण आहे? कोण नाही हे न्यायालय ठरवत नाहीत. विरोधी पक्षनेत्याचे काम आहे, सरकारला आव्हान देण्यासाठी प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य आहे.”असे त्या म्हणाल्या आहेत.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “माझा भाऊ (राहुल गांधी) कधीही सैन्याविरुद्ध काहीही बोलणार नाही. तो सैन्याचा खूप आदर करतो. त्यामुळे, हा चुकीचा अर्थ लावला जातो.”असे म्हणत त्यांनी सर्वोच्च न्यायालयांच्या टिपण्णीवर भाष्य केले आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे? Priyanka Gandhi on Central Government।
भारत आणि चीनच्या सैन्यांमधील संघर्षाबाबत राहुल गांधी यांच्या विधानांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने समन्स बजावले होते. यासोबतच राहुल गांधी यांनी इतर प्रलंबित प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
‘ तुम्ही सर्व सोशल मीडियावर का लिहितात?’
सुनावणीदरम्यान, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना अतिशय कठोर स्वरात प्रश्न विचारला. त्यांना विचारण्यात आले की तुम्हाला कसे कळले की चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आहे. तुम्ही कोणत्याही पुराव्याशिवाय असे विधान का केले? जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे बोलणार नाही. न्यायालयाने राहुल यांना संसदेत असे मुद्दे उपस्थित करण्यास सांगितले आणि विचारले की ते हे सर्व सोशल मीडियावर का लिहितात?” Priyanka Gandhi on Central Government।





