मन्नारा चोप्राने विमानतळावरील शेअर केला व्हिडीओ; इंडिगो एअरलाइन्सवर व्यक्त केला संताप

Mannara Chopra Indigo Airlines | अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि अभिनेत्री मन्नारा चोप्रा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे दिसते. अलिकडेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मन्नारानं विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर करत इंडिगो एअरलाइन्सवर नाराजी व्यक्त केली आहे.
मन्नारा व्हिडीओमध्ये इंडिगो एअरलाइन्सवर संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये तिने एअरलाइनच्या स्टाफवर प्रवाशांना चुकीची वागणूक दिल्याचा देखील आरोप केला.
नई दिल्ली : इंडिगो एयरलाइन्स पर भड़कीं मन्नारा चोपड़ा, लगाया पैसेंजर से बदसुलूकी करने का आरोप, कहा- फ्लाइट समय से पहले कैसे टेकऑफ हुई #NewDelhi #MannaraChopra @IndiGo6E #IndiGoFlight #DelhiAirport #ViralVideo #PeoplesUpdate pic.twitter.com/rxMvajCwmM
— Peoples Update (@PeoplesUpdate) March 23, 2025
व्हिडीओमध्ये मन्नारा चोप्राने सांगितले की, फ्लाइट तिच्या समोरच होती तरी देखील तिला चढू दिलं नाही. यावेळी आणखी एक महिला ही मन्नाराला पाठिंबा देत म्हणते की, ‘तू सेलिब्रिटी आहे तुझ्यासाठी तर अनाऊंसमेंट करायला हवी. त्या महिलेनं हे देखील सांगितलं की ती देशाची सेवा करते.’ यावरून काही लोक मन्नाराला पाठिंबा देत आहेत तर काही जण तिला ट्रोल करत आहे. Mannara Chopra Indigo Airlines |
दरम्यान, मन्नारा चोप्राला ‘बिग बॉस’मुळे मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या मन्नारा ‘लाफ्टर शेफ सीझन 2’ मध्ये दिसत आहे. Mannara Chopra Indigo Airlines |
हेही वाचा:





