केरळ भाजपाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्र्यांची निवड होणार; जाणून घ्या नेमकी कोणती असणार आव्हाने?

Rajeev Chandrasekhar | केरळ राज्याच्या भाजप अध्यक्षपदी माजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. केरळमधील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या दृष्टीने राजीव चंद्रशेखर यांची निवड महत्त्वाची ठरू शकते. सोमवारी तिरुवनंतपुरममधील कौडियार येथील उदय पॅलेस कन्व्हेशन सेंटरमध्ये पार पडणाऱ्या पक्षाच्या परिषदेत चंद्रशेखर यांचे नाव अधिकृतपणे घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
तिरुवनंतपुरम येथे पक्षाचे केरळमधील प्रभारी प्रकाश जावडेकर व लोकसभा खासदार अपराजिता सारंगी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. गेल्या वर्षी तिरुवनंतपुरममधून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडून चंद्रशेखर यांना १६ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी चंद्रशेखर यांनी थरूर यांना चांगलीच टक्कर दिली होती.
चंद्रशेखर यांच्यापुढे असणार मोठी आव्हाने
केरळसारख्या राज्यात हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही समाजांची मतं मिळवण्यात चंद्रशेखर निर्णायक भूमिका बजावतील असं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटतं. त्याआधारेच चंद्रशेखर यांच्याकडे केरळ राज्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. चंद्रशेखर स्वत:नायर समुदायातील असल्याने उच्चवर्गातील हिंदूंची मतं त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
ख्रिश्चन समुदायाला पक्षाकडे आकर्षित करील, असा नेता भाजपाला पाहिजे आहे. तसेच राज्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमधील दरी वाढत असली तरी हे दोन्ही समुदाय सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावित आहेत. ख्रिश्चन समुदायाचा एक भाग राज्याच्या लोकसंख्येच्या १९ टक्के असून हा पारंपरिकरीत्या काँग्रेसला मत देणारा आहे. मात्र हा समुदाय काँग्रेसच्या राजकीय भूमिकेत मुस्लिम समुदायाच्या वाढत्या सहभागामुळे नाराज आहे. Rajeev Chandrasekhar |
राजीव चंद्रशेखर यांची कारकीर्द
जुलै २०२१ मध्ये त्यांच्या विकासाप्रती असलेल्या दृष्टिकोनामुळे त्यांना मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. ते सेमी-कंडक्टर उत्पादन क्षेत्रातले एक तंत्रज्ञानी उद्योजक आहेत. चंद्रशेखर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रसार आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे..एआयच्या युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील प्रशासनात विविध मुद्द्यांसंदर्भात बदल घडवण्याबाबत त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. Rajeev Chandrasekhar |
60 वर्षीय राजीव चंद्रशेखर यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि जल उर्जा विभागांचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. चंद्रशेखर हे तीन वेळा राज्यसभेचे खासदार होते. यासह, त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम केले आहे. त्यांनी तिरुअनंतपुरम येथून 2024 ची लोकसभा निवडणुका लढवली होती. पण 16077 मतांच्या फरकाने कॉंग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडुन त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, केरळमध्ये मे 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत राजीव चंद्रशेखर यांच्याकडे एक वर्ष आहे. राज्यात भाजपाला बळकटी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. २०२१ च्या निवडणुकीत, भाजपाला राज्यात 11.30 टक्के मते मिळाली होती, येथे पक्षाने खातेही उघडले नाही. मात्र आता राजीव चंद्रशेखर यांचे विधानसभेमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचे ध्येय असणार आहे. Rajeev Chandrasekhar |
हेही वाचा:
Kunal Kamra : मुख्यमंत्र्यांनी कामराला झापलं; म्हणाले… “हे सहन करणार नाही”





