Sanjay Raut : प्रियंका चतुर्वेदी खासदारांच्या बैठकीत भडकल्या? संजय राऊत यांनी एकाच वाक्यात विषयचं संपवला म्हणाले…
Sanjay Raut : खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी भडकल्या असल्याची माहिती समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची एक बैठक आयोजित केली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेच्या जागेवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे बोलत असतानाच प्रियंका चतुर्वेदी भडकल्या आणि त्यांनी संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं? असा सवाल केला. त्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. ते (संजय राऊत) बोलले म्हणून काय झालं? पक्षप्रमुख मी आहे. ते बोलले म्हणून काय झालं शेवटी निर्णय मीच घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यानंतर राजकीय वर्तुळात खासदारांच्या बैठकीत झालेल्या खडाजंगी झाल्याची चर्चा रंगली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मला माहिती नाही. मी त्या बैठकीला नव्हतो. असं काही अजिबात घडलेलं नाही. मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य आहे एवढचं मी सांगतो”. असे ते म्हणाले. Sanjay Raut
पुढे संजय राऊत म्हणाले, स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नियुक्त केले त्यातला मी एक आहे. माझं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. असे म्हणत त्यांनी या साऱ्या अफवा असल्याचे म्हणत अधिकचे भाष्य करणे टाळले. Sanjay Raut

Sanjay Raut : प्रियंका चतुर्वेदी खासदारांच्या बैठकीत भडकल्या? संजय राऊत यांनी एकाच वाक्यात विषयचं संपवला म्हणाले.
राज्यात सध्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणात दररोज नवे हादरून टाकणारे तपशील समोर येत आहेत. खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, या प्रकरणावर रोज बोलणे योग्य नाही. तपास सुरू असून त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. रोज या विषयावर चर्चा करून महाराष्ट्र आणि केंद्रातील महत्वाच्या विषयावर पाणी टाकण्याचे उद्योग सुरू आहेत.
हेही वाचा : Acidity: दही खायचं की ताक प्यायचं? पचनासाठी करा योग्य निवड!





