प्रिया सिंह मारहाण प्रकरण: अश्वजीत गायकवाडला 24 तासांत जामीन
Updated On:

Priya Singh Case – इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर प्रिया सिंहला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अश्वजीत गायकवाडला एक दिवसांत जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह त्याच्या मित्रांना रविवारी रात्री ठाणे पोलिसांनी अटक केली होती. आज (सोमवार) त्यांना कोर्टात सादर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यावर प्रेयसी आणि सोशल मीडिया इन्फ्लोएन्सर प्रिया सिंहला मारहाण करत गाडीने उडवल्याचा आरोप आहे.
हा धक्कादायक प्रकरण 11 डिसेंबरच्या रात्री घोडबंदर रोडवर येथे घडला. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणा–या पोलीस प्रशासनावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांची दखल घेण्यात आली.





