सुखी संसाराची 13 वर्ष पूर्ण; प्रिया बापटने उमेशसोबतचे फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

Priya Bapat And Umesh Kamat | अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांची मराठी सिनेसृष्टीतील जोडी लोकप्रिय आहे. या दोघांची केमेस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसते. सोशल मीडियावर देखील ही जोडी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच उमेश आणि प्रियाच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झाली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने पती, अभिनेता उमेश कामसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लग्नाला 13 वर्षे झाली आणि आपण 20 वर्षे एकत्र राहत आहोत… खूप प्रेम, हसणं आणि विचारणं रात्रीच्या जेवणासाठी काय हवं आहे?” , असा प्रश्नही प्रिया विचारते. प्रिया बापटच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
उमेश आणि प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, उमेश शेवटचा ‘माय-लेक’ या चित्रपटात झळकला होता. तर ‘रफूचक्कर’ या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रिया शेवटची झळकली होती. लवकरच उमेश ‘येरे येरे पैसा-३’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर प्रिया ‘रात जवान है’ या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ११ ऑक्टोबरला प्रियाची नवी सीरिज ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होतं आहे. तसेच प्रिया आणि उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला देखील उदंड प्रतिसाद मिळाला. Priya Bapat And Umesh Kamat |





