प्रिया बापटने IMDbच्या लोकप्रिय सेलिब्रिटींच्या यादीत मिळवले दुसरे स्थान

Priya Bapat | मराठी सिनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापट सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहे. मराठीसह तिने हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे. तिने बॉलीवूड अभिनेत्रीना देखील मागे टाकत दमदार कामगिरी केली आहे. प्रिया बापटने आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
प्रिया म्हणाली की, “आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत या आठवड्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आहे, याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मी आयएमडीबीचे मनःपूर्वक आभार मानते. प्रत्येक कलाकाराचं टॅलेंट आणि मेहनत याला आयएमडीबीकडून मिळालेली ही एक पावती आहे. माझ्या सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानते. या वर्षी प्रदर्शित होत असलेल्या माझ्या प्रोजेक्ट्ससाठी मी खूप उत्सुक आहे. त्यावर देखील प्रेक्षक आणि चाहते खूप प्रेम करतील अशी मला खात्री आहे.”
नुकतेच तिची सीरिज ‘रात जवान है’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही सीरिज मुलांचं संगोपन करताना येणाऱ्या आव्हानांना सामोऱ्या जाणाऱ्या तीन मित्रांच्या कथेवर आधारित आहे.
View this post on Instagram
ईशान खट्टरनं त्याचा पहिला क्रमांक सलग तिसऱ्या आठवड्यात कायम ठेवला आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, शाहरुख खान आणि सलमान खान अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, सहाव्या आणि तेराव्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, ‘तुम्बाड’ पुन्हा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये परत आणत नायक सोहम शाहने या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. विक्रांत मसेने आपल्या क्राइम ड्रामा चित्रपट ‘सेक्टर36’ च्या ओटीटी प्रीमियरनंतर या यादीत 9वे स्थान मिळविले आहे. दीपक डोबरियाल 37व्या स्थानावर आहे. तृप्ती डिमरी आपल्या आगामी चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ साठी 8व्या स्थानावर आहे. तिचा सहकलाकार राजकुमार राव 21व्या स्थानावर आहे.





