Private Travels: खासगी ट्रॅव्हल्सला आरटीओचा दणका
Private Travels:

जादा भाडे घेणाऱ्या १४ बसेसवर दंडात्मक कारवाई
Private Travels: दिवाळी आणि सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची अडचण पाहून त्यांच्याकडून अवाजवी आणि मनमानी भाडे वसूल करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक कारवाईचा बडगा उचलला आहे.
शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक भाडे घेणाऱ्या १४ बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३०९ वाहने दोषी आढळली.
सणासुदीत प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचालक जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या सूचनेनुसार पुणे शहर व परिसरात खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे.
दि. १ ते ७ नोव्हेंबरपर्यंत ३०९ वाहने तपासली असून, ६५ वाहने दोषी आढळली. त्यामध्ये १४ बसेस प्रवाशांची लूट करताना सापडल्या असून, त्यांच्याकडून ७.०४ लाख रुपये दंड वसूल केला.
दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ या दोन महिन्यांत तपासणी केलेल्या ९२९ वाहनांपैकी ३१५ वाहने दोषी आढळली, तर ७ बसेस जादा भाडे आकारताना पकडल्या. या कारवाईतून २५.८२ लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली.
प्रवाशांनी पुढे यावे! Private Travels:
कोणतीही खासगी बस जादा भाडे मागत असेल किंवा प्रवासात काही अडचण येत असेल, तर प्रवाशांनी घाबरून न जाता आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि तिकिटाच्या फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर थेट तक्रार नोंदवावी. प्रवाशांना लुटणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आरटीओ प्रशासनाने दिला आहे.
कारवाईचा कालावधी तपासलेली वाहने दोषी वाहने वसूल केलेला दंड (लाखात)
सप्टेंबर व ऑक्टोबर ९२९ ३१५ २५.८२
विशेष मोहीम ३०९ ६५ ७.०४
(१ नोव्हेंबरपासून) १,२३८ ३८० ३२.८६





