Prithviraj Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा, अशी मागणी केली आहे. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या कटाक्ष या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते. चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, आज अंबानी, अदानी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागांत केवळ एका कॉर्पोरेट हाऊसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. Prithviraj Chavan हा प्रयत्न एस. जयपाल रेड्डी माहिती व नभोवाणी मंत्री असताना करण्यात आल्याचा हवाला देत ते म्हणाले की, अनेक देशांत अशा प्रकारची बंधने आहेत. भारतात गेल्या दहा-बारा वर्षांत अशा प्रकारच्या बंधनांची अधिक गरज निर्माण झाली आहे. माईणकरांच्या लेखांची प्रशंसा करत ते म्हणाले की, माईणकरांनी अशा अनेक विषयांना हात घातला आहे, ज्यावर मराठीत फारसे लिहिले जात नाही. पक्षांतराविषयीचा माईणकरांचा लेख किंवा वाजपेयी, जॉर्ज आणि प्रेमप्रकरण यांसारखे विषयही त्यांनी हाताळले आहेत. तसेच, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपल्या भाषणात माईणकरांच्या निर्भीड लेखणीची प्रशंसा करत सध्या इतक्या परखड लिखाणाची फार गरज असल्याचे नमूद केले. जयंत माईणकर लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित ‘कटाक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते.