Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न पूर्ण, आधी घेतलं स्वतःच घर आणि आता…..

Prithvik Pratap । Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. यातील कलाकारांना देखील या शोमुळे वेगळी ओळख मिळाली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे संपूर्णच कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोमधील कलाकारमंडळी अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आणि त्यामुळेच महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे.
अश्यातच, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपलं आणखी एक स्वप्न सत्यात उतरवलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्वतःच घर घेतलं आता त्याने आपल्या हक्काची पहिली गाडी घेतली आहे. पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
तो म्हणाला की, ‘पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या’, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून अनेक नवोदित कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची नवीन संधी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून पृथ्वीक घराघरांत पोहोचला.





