पंतप्रधान नरेंद्र मोदी, मल्लिकार्जुन खरगेंसह दिग्गज नेत्यांकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन

Gandhi Jayanti 2023 : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना(Mahatma Gandhi) अभिवादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीचे उपराज्यपाल वी. के. सक्सेना, उपराज्यपाल जगदीप धनखड यांनी देखीलमहात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यासोबतच अनेक नेते राजघटावर बापूंना श्रद्धांजली अर्पण करण्यारकता राजघाटावर दाखल झाले होते.
#WATCH | Delhi: PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat on the occasion of #GandhiJayanti pic.twitter.com/snfVr7x8bx
— ANI (@ANI) October 2, 2023
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करत, “गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) नमन करतो. त्यांच्या शिकवणीमुळे आमचा मार्ग उजळत आहे. महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) प्रभाव जागतिक आहे, संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करते. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू या. गांधींचे विचार प्रत्येक तरुणाला परिवर्तनासाठी पात्र बनवून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी बळ मिळू दे. ज्यामुळे सगळीकडे एकता आणि सद्भावना वाढेल”, असे म्हटले.
आज महात्मा गांधी जी की जयंती के अवसर पर कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge ने राजघाट स्थित बापू की समाधि पर पुष्प अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी। pic.twitter.com/5KLhp7CtQr
— Congress (@INCIndia) October 2, 2023
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील राजघाट येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळ हजर असतात. आज दिवसभर अनेक नेतेमंडल राजघाट येथे दाखल होऊन महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) नमन करणार आहेत.




