Lok Sabha Election 2024 : ‘पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास ढळला’ – अखिलेश यादव

बलिया – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मविश्वास गमावला आहे आणि भाजप केंद्रात सत्ता टिकवून ठेवणार नाही हे लक्षात आल्यावर ते डगमगले आहेत. त्यांच्या भाषणातूनच हे प्रतित होत आहे, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असे सांगून ते म्हणाले की, ४ जूननंतर, ज्या दिवशी मतमोजणी होईल, त्या दिवशी केंद्रातील सरकार बदलेले असेल.
सालेमपूर येथील समाजवादी पक्षाचे उमेदवार राम शंकर विद्यार्थी यांच्या प्रचारार्थ आयोजित निवडणूक रॅलीत बोलताना यादव यांनी इंडिया आघाडीने सरकार स्थापन केल्यास अग्निवीर योजना रद्द करण्याचे आश्वासन दिले.
भाजपविरोधात लोकांचा रोष शिगेला पोहोचला असल्याचा दावा करून यादव म्हणाले, देशातील १४० कोटी जनता भाजपला १४० जागांसाठीही सतावेल.
मोदी सरकारने उद्योगपतींचे २५ लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज माफ केले आहे. इंडिया आघाडीचे सरकार मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल आणि त्यांच्यासाठी एमएसपी लागू करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.





