‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी तुलसी गबार्ड यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत

कार्यक्रमास हजर राहु शकत नसल्याबद्दल गबार्ड यांच्याकडून दिलगिरी व्यक्‍त

वॉशिंग्टन : ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्युस्टनमध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या तुलसी गबार्ड यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी या कार्यक्रमाला आपण पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उपस्थित राहू शकणार नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी दोन्ही देशांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे की, नमस्ते, अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून स्वागत करते. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी हाऊडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. संपर्ण अमेरिकेतून आलेले अनेक अमेरिकी भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याबद्दल मला खूप आनंद होतो आहे. तसेच तुलसी गबार्ड यांनी, भारत हा जगातील मोठा लोकशाही देश आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करून द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यावर मार्ग शोधले पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने वातावरण बदल, अण्वस्त्र युद्ध रोखणे, दोन्ही देशांच्या आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा करणे याचा समावेश होतो असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)