Prime Minister Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सिंगापूचा दौरा करणार आहेत, असे सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी म्हटले आहे. भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या वरिष्ठ मंत्रीस्तरीय गोलमेज बैठकीच्या समारोप प्रसंगी त्यांनी ही माहीती दिली. भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीला अधिक दृढ करण्याया उद्देशाने दोन दिवस ही गोलमेज बैठक सुरू होती.
द्विपक्षीय सहकार्य आणि परस्पर हिताच्या मुद्यांवरील दृष्टीकोनांची आदान प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या गोलमेज बैठकीमध्ये भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सितारामन, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी झाले होते.
ही बैठक सकारात्मक झाली आणि या बैठकीद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्याची पार्श्वभुमी निश्चित करण्यास मदत झाली, असे सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी सांगितले.
मोदींच्या सिंगापूर दौऱ्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. या दौऱ्याची तारीख आताच सांगता येणार नाही. मात्र निश्चिती झाल्यावर लगेचच ही तारीख जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
या गोलमेज बैठकीदरम्यान भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या विविध उद्योग, संरक्षण, रोजगार आणि उत्पादन क्षेत्रांशी संबंधित सहकार्याच्या मुद्यांवर विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली. प्रगत उत्पादन आणि अर्धसंवाहक,
तसेच विमान वाहतूक आणि सागरी कनेक्टिव्हिटी ही नवीन क्षेत्रे आहेत जी सिंगापूर आणि भारताने द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने देखील चर्चा झाली, असेही बालकृश्णन यांनी सांगितले.
भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज सप्टेंबर २०२२ मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी पाच दिवसांच्या भारत भेटीदरम्यान सुरू केले होते.