Pune News : दस्त नोंदणीतील फसवणूक रोखा; गैरप्रकार होत असल्याने महसूल विभागाचे आदेश
Updated On:

पुणे : एक जिल्हा एक नोंदणी या सुविधेमध्ये नागरिकांना एकाच जिल्ह्यातील कोणत्याही टुव्यम निबंधक कार्यालयात काही ठराविक दस्तांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, या प्रणालीमध्ये काही गैरप्रकार आणि अनियमितता होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
वा पाश्र्वभूमीवर दस्तनोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. दस्त नोंदणीतील फसवणूक आणि अनियमितता रोखण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने दिलेल्या सूचना व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेशही शासनाने सर्व दुय्यम निबंधकांना दिले आहेत.
दुय्यम निबंधकांना दिलेल्या सूचना
- दस्त नोंदणी करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ व नोंदणी अधिनियम, १९०८ मधील सर्व तरतुदी, महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ व महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाचे इतर अधिनियम, नियम, तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांतील सूचना व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.
- दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.
- दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- ज्या प्रकरणात नोंदणी अधिनियमातील कलम ८२ व ८३ नुसार कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाल्यास अशा प्रकरणात दोषींविरुद्ध सात दिवसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी
- सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी व्यांच्या अधिनस्त दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करून प्रत्येक १५ दिवसांनी शासनास अहवाल सादर करावा,
- याशिवाय दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांचे प्रकार, स्वरूप व कार्यपद्धती लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात.





