Tirupati : चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत राष्ट्रपती मुर्मू यांचा शोक संदेश; मृत नागरिकांच्या कुटुबांप्रती संवेदना, जखमींनी बरे होण्यासाठी प्रार्थना

तिरुपतीः आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती देवस्थानमध्ये चेंगराचेंगरी घटना घडली. या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहे. या घटनेबाबत देशाच्या राष्ट्रपती दौर्पदी मुर्मू यांनी त्यांच्या एक्स या अकाऊंटवरून शोक व्यक्त केला आहे. या शोक संदेशात मुर्मू यांनी तिरुपती येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे जीवितहानीबद्दल दुःख झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच चेंगराचेंगरीच्या घटनेत प्राण गमावल्याने त्यांना दुःख झाले आहे. कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करत असल्याचे त्या म्हणाल्या.
तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांना जीव गमवावा लागला हे जाणून दु:ख झाले. मी शोकग्रस्त कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते,” असे मुर्मू यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तिरुमला टेकडीवरील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात वैकुंठद्वार दर्शनमच्या तिकीटासाठी आलेल्या लोकांची बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला आणि काही लोकं जखमी झाले आहेत.
Distressed to know that a stampede in Tirupati led to loss of life of many devotees. I extend my heartfelt condolences to the bereaved families and pray for speedy recovery of the injured.
— President of India (@rashtrapatibhvn) January 9, 2025
नेमकं काय झालं होतं
आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून किमान ३० जण जखमी झाले आहेत.





