video : प्रीमिअर हॅंडबॉल लीग ; महाराष्ट्र आयर्नमॅनच्या जर्सीचे अनावरण!

Updated On:

पुणे  -जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमिअर हॅंडबॉल लीगमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने मंगळवारी पुण्यात एका शानदार कार्यक्रमात या हंगामासाठी त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी संघमालक पुनित बालन आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार आणि सहायक प्रशिक्षक अजय कुमार उपस्थित होते. केदार जाधव हे महाराष्ट्र आयर्नमेनचे चाहते आहेत.

हॅंडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ असल्याने, तो पुनित बालन ग्रुपच्या दृष्टीक्षेपात आहे. त्यांची ही दृष्टी भारतात क्रिकेटेतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकसित करण्याच्या उत्कटतेशी पूर्णपणे जुळते, जेणेकरून देश ऑलिम्पिक खेळांमध्ये नवीन उंची गाठू शकेल.

कार्यकमाला संबोधित करताना, पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले की, हॅंडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ आहे, हे आपण सर्व जाणतो आणि या खेळाला भारतात पुढच्या स्तरावर नेण्याचा आमचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपले खेळाडू देखील या खेळात ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे आणि पदके जिंकण्याचे स्वप्न पाहू शकतात.

आपल्या खेळाडूंना सर्वांगीण अनुभव देऊन त्यांना योग्य संधी आणि समर्थन प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र आयर्नमेन देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक चाहत्यांना आकर्षित करतील.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी सांगितले की, हॅंडबॉलशी त्यांचे विशेष नाते आहे आणि ते संपूर्ण हंगामात महाराष्ट्र आयर्नमनला सपोर्ट करतील. मी शाळेत हॅंडबॉल खेळलो आहे आणि या खेळाशी माझा विशेष नातं आहे. आपण सर्वांनी ऑलिम्पिकमध्ये हा खेळ पाहिला आहे आणि मला खात्री आहे

की पुनित बालन आणि महाराष्ट्र आयर्नमनच्या दूरदृष्टीने आपण लवकरच त्या स्तरावर पोहोचू. मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र आयर्नमनबद्दलचे प्रेम स्वाभाविकपणे येते. सर्व खेळाडू आणि कर्मचारी यांना माझ्या शुभेच्छा आणि मला खात्री आहे की ते लीग जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असे केदार जाधव म्हणाले.

महाराष्ट्र आयर्नमेनचे मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार म्हणाले, स्पर्धेसाठी आमची चांगली तयारी सुरू आहे. प्रीमिअर हॅंडबॉल लीग ही दीर्घ स्पर्धा होणार असल्याने आम्ही खेळाडूंच्या फिटनेसवर भर देत आहोत. आम्ही बरेच सामने खेळू आणि त्यानुसार आमची तयारी करत आहोत.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Lionel Messi Retires : लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; फेअरवेल सामन्यानंतर लेक थियागो भावूक, VIDEO व्हायरल

2026-10-07 21:07:47

Lionel Messi Retires : लिओनेल मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; फेअरवेल सामन्यानंतर लेक थियागो भावूक, VIDEO व्हायरल

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास