प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार खलनायकाच्या भूमिकेत; पाहा खतरनाक लुक

Pravin Tarde | अभिनेता प्रवीण तरडे यांनी अनेक चित्रपटात आपल्या भूमिकेने लोकांची मनं जिंकली. अभिनयासह ते लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रसिध्द आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, ‘धर्मवीर’ या सारख्या चित्रपटाचे त्यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटात मोठे यश मिळवल्यानंतर प्रवीण तरडे आता दक्षिणेतील चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून यातील त्यांचा पहिला लुक देखील समोर आला आहे.
प्रवीण तरडे यांच्या या आगामी दाक्षणित्य चित्रपटाचे ‘अहो विक्रमार्का’ असे नाव आहे. त्यांनी या चित्रपटातील त्यांचा लुक इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच त्यांच्या भूमिकेविषयी माहिती दिली. प्रवीण तरडे अहो विक्रमार्का चित्रपटामध्ये ‘असुरा’ नावाची भूमिका साकारत असून ते यात खलनायकाच्या भूमिकेत असतील.
View this post on Instagram
या फोटोला “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत “ मुख्य खलनायक “ म्हणून माझा प्रवेश .. अहो विक्रमार्का मध्ये “ असुरा “ बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे चित्रपट येत आहे. अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे,” असे कॅप्शन प्रवीण तरडे यांनी दिले आहे. Pravin Tarde |
‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटामध्ये दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता देव गिल प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह चित्रा शुक्ला, तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे हे kला . दरम्यान, प्रवीण तरडेंनी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातील आपला पहिला लूक शेअर केल्यावर त्याच्यावर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. Pravin Tarde |
हेही वाचा:
Karnataka : भाजप नेत्याचा पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनादरम्यान मृत्यू; नेमकं काय घडलं?





