Rupali Chakankar : भोंदू खरात प्रकरणात चाकणकर कुटुंब अडचणीत; प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस
Rupali Chakankar : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाचा फास आवळत असून, चाकणकर कुटुंबियांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. (Rupali Chakankar)
या प्रकरणात राजकीय संबंधांची चर्चा रंगू लागल्याने तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातविरोधात शिर्डीत सावकारीचा गुन्हा दाखल असून, त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. Rupali Chakankar
तपासादरम्यान समता पतसंस्थेतील काही संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. या पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण चार खाती असल्याचे उघड झाले आहे. यापैकी दोन खाती स्वतः प्रतिभा यांच्या नावावर, तर उर्वरित दोन त्यांच्या मुलांच्या नावावर आहेत. Rupali Chakankar

Rupali Chakankar : भोंदू खरात प्रकरणात चाकणकर कुटुंब अडचणीत; प्रतिभा चाकणकरांना पोलिसांची नोटीस
या खात्यांमधून गेल्या काही काळात सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम कुठून आली, तसेच व्यवहार नेमके कोणासोबत झाले, याबाबत आता पोलीस चौकशी करणार आहेत. त्यासाठी पुढील पाच दिवसांत हजर राहण्याचे आदेश प्रतिभा चाकणकर यांना देण्यात आले आहेत. (Rupali Chakankar)
दरम्यान, शिर्डी पोलिसांनी त्यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर नोटीस पाठवली असून, त्या चौकशीसाठी कधी हजर राहणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
याच प्रकरणात सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेतही अशोक खरात नॉमिनी असलेली तब्बल ३२ खाती आढळून आली आहेत. त्यामुळे शिर्डी आणि सिन्नर या दोन्ही ठिकाणी असलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून, नाशिक ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Rupali Chakankar)





