Dhoni RPS Captaincy : ‘धोनीला कॅप्टन्सीवरुन हटवल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता…’,फाफ डू प्लेसिसने उलगडला IPL मधील कटू इतिहास
Dhoni RPS Captaincy : आयपीएल २०१६ नंतप धोनीकडून रायझिंग पुणे सुपरजायंट्स (आरपीएस) संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. या निर्णयामुळे फॅफ डु प्लेसिसला धक्का बसला होता.

Faf du Plessis on MS Dhoni Sacked as RPS Captain in IPL 2017 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला २०१६ च्या हंगामानंतर रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या (RPS) कर्णधारपदावरून अचानक काढून टाकण्यात आले होते. या अनपेक्षित आणि वादग्रस्त निर्णयाची आठवण काढत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मोठा खुलासा केला आहे. त्यावेळी या निर्णयाने ड्रेसिंग रूममधील सर्वच खेळाडू थक्क झाले होते, असे डू प्लेसिसने स्पष्ट केले. मात्र, अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही स्टीव्ह स्मिथ याने संघाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळत पहिल्याच प्रयत्नात पुण्याला थेट अंतिम फेरीत नेल्याचे कौतुकही त्याने केले.
फ्रँचायझीच्या एका निर्णयाने क्रिकेट जगताला बसला होता धक्का –
‘क्रिकइन्फो’च्या ‘क्रिकेटर्स ऑन क्रिकेटर्स’ या विशेष कार्यक्रमात बोलताना फाफ डू प्लेसिसने २०१६ च्या त्या वादळी हंगामातील आठवणींना उजाळा दिला. डू प्लेसिस म्हणाला, “आयपीएल २०१६ च्या हंगामानंतर एमएस धोनीला पुण्याने कर्णधारपदावरून बाजूला केले. इतक्या मोठ्या स्पर्धेतील हा आजवरचा सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय होता. आम्ही काही सामने गमावले होते आणि संघ मालकाने तडक कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने प्रत्येकालाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता.”
‘धोनी संघात असताना कप्तानी करणे सोपे नव्हते’ –
When it comes to captaincy and leadership, Faf du Plessis believes MS Dhoni has the edge over Virat Kohli. He feels fortunate to have played under Dhoni’s captaincy in the IPL.
Credit: Prakhar Gupta’s Podcast https://t.co/EEEM8OoMzO
— Fizaaa 👋 (@FizaNigam) October 28, 2026
धोनीच्या जागी तरुण स्टीव्ह स्मिथकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. डू प्लेसिसने नमूद केले की, त्या काळात स्मिथकडे कर्णधारपदाचा मोठा अनुभव नव्हता. त्यातच ज्या दिग्गजाला नुकतेच कर्णधारपदावरून हटवले आहे, तोच धोनी संघात खेळाडू म्हणून उपस्थित असताना त्याच्यासमोर नेतृत्व करणे हे कोणत्याही कर्णधारासाठी प्रचंड दबाव आणि आव्हानाचे काम होते. मात्र, स्मिथने हे दडपण उत्कृष्टपणे हाताळले आणि सर्वांना सोबत घेऊन संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेले.
अवघ्या एका धावेने हुकले जेतेपद; डू प्लेसिसने व्यक्त केली खंत
Sanjiv Goenka said, ” He had never seen a leader like MS Dhoni”.
Same Goenka removed MS Dhoni from RPS captaincy and appoint Steve Smith in 2017.
https://t.co/K9vzsfHwWT
— vs (@thehellocricket) April 2, 2026
२०१७ च्या त्या थरारक अंतिम सामन्यात पुण्याचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या एका धावेने पराभूत झाला होता. यावर खंत व्यक्त करताना डू प्लेसिस म्हणाला, “आम्ही तो अंतिम सामना गमावला, जो आम्ही सहज जिंकायला हवा होता. आम्ही विजयाच्या अत्यंत जवळ पोहोचलो होतो. जर आम्ही तो अंतिम सामना जिंकलो असतो, तर स्मिथ पहिल्याच प्रयत्नात आयपीएल चषक जिंकणारा कर्णधार ठरला असता. यावरूनच त्याच्या नेतृत्वगुणांची ताकद अधोरेखित होते.”
लेग स्पिनर ते जागतिक दर्जाचा फलंदाज: फिंचकडून स्मिथचे कौतुक
याच कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर ॲरॉन फिंचने स्मिथच्या क्रिकेट प्रवासावर भाष्य केले. फिंच म्हणाला की, सुरुवातीला स्मिथला शेन वॉर्नचा वारसदार मानले जात होते. तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत काही षटके लेग स्पिन टाकत असे. मात्र, तंत्रात केलेला बदल, उत्कृष्ट मनगटी खेळ आणि सततची हालचाल याच्या जोरावर त्याने स्वतःला जगातील अव्वल फलंदाज म्हणून सिद्ध करून संपूर्ण जगाला अचंबित केले.





