Prakash Ambedkar : शेतकरीच नालायक आहे… मरायचंच असेल तर 10-12 पुढाऱ्यांना मारून मरा; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ
Prakash Ambedkar : शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या व्यवहारावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आणि राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे

Prakash Ambedkar : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या व्यवहारावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकार आणि राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (Prakash Ambedkar)
‘शेतकरीच नालायक आहेत’; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्यांना शेतकरी मतदान करत नाहीत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. बुलढाण्यात रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत असतानाही शेतकरी दुसऱ्याच उमेदवाराला निवडून आणतात, असे ते म्हणाले. याच संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून वादग्रस्त शब्दांचा वापर केला. (Prakash Ambedkar)
शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या राजकीय नेत्यांवरही टीका केली. त्यांच्या वक्तव्यादरम्यान, “मरायचंच असेल तर १०-१२ पुढाऱ्यांना मारून मरा,” असे विधान त्यांनी केल्याचे वृत्त आहे. या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Prakash Ambedkar)
सरकारने अन्नधान्य आणि चाऱ्याचे नियोजन केले नाही
दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल निनोचा संभाव्य परिणाम गेल्या वर्षापासून माहीत असतानाही राज्य सरकारने अन्नधान्य, पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत पुरेसे नियोजन केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. (Prakash Ambedkar)
सरकारने अन्नधान्य आणि चारा उपलब्ध करून दिला नाही, तर नागरिकांनी मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरांसमोर जाऊन मागणी करावी, असे ते म्हणाले. दुष्काळ आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. (Prakash Ambedkar)
शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवरही गंभीर आरोप
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशांचा वापर झाल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, पाच उमेदवारांनी प्रत्येक मतासाठी सुमारे पाच हजार रुपये खर्च केले. ३० हजार मतांचा हिशेब धरल्यास हा खर्च १५ कोटी रुपयांपर्यंत जात असल्याचे ते म्हणाले. (Prakash Ambedkar)
हा पैसा कुठून आला आणि या प्रकरणात आयकर विभाग किंवा ईडी चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीतील कथित पैशांच्या व्यवहारावर टोला लगावत त्यांनी शिक्षक आणि शिक्षिकांसंदर्भातही उपरोधिक टिप्पणी केली. (Prakash Ambedkar)





