Prajwal Revanna Arrest Warrant : प्रज्वल रेवण्णाच्या विरोधात अटक वॉरंट जारी

बेंगळुरू – लैंगिक अत्याचार आणि सेक्स स्कँडल प्रकरणातील आरेापी व जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध येथील विशेष न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
या प्रकरणात त्यांचे वडील आणि होलेनरासीपुराचे आमदार एचडी रेवण्णा हे देखील आरोपी आहेत.एच. डी रेवण्णा हे सध्या जामीनावर बाहेर आहेत तर प्रज्वल रेवण्णा हे विदेशात पळून गेले आहेत.
एनडीएचे हसन लोकसभा उमेदवार व जेडीएस पक्षाचे विद्यमान खासदार प्रज्वल यांच्याविरुद्ध तीन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्या सेक्स स्कँडलच्या तीन हजार व्हिडीओ व्हायरल झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
कर्नाटक सरकारने प्रज्वल यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांच्या शिफारशींवर हे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.





