Prajakta Mali: “गेल्या महिन्याभरात काढले नाहीत एवढे…”; प्राजक्ता माळीची राजस्थानमध्ये सफर
Prajakta Mali: प्राजक्ता आगामी 'शुभ मंगलम जोडी दंगलम' सिनेमात दिसणार

Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या राजस्थानमध्ये आहे. तिच्या आगामी ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त प्राजक्ता राजस्थानला गेली आहे. मात्र शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ताने राजस्थानची सफर केली आणि सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
राजस्थानमध्ये फिरायला जायची तिची खूप इच्छा होती जी आता पूर्णझ झाल्याचे ती सांगते. यावेळी प्राजक्ता माळी राजस्थानमधील विविध महल, पॅलेसला भेट देत आहे. पुष्कर, जैसलमेर या ठिकाणांहून तिने अनेक फोटो शेअर केले.
तिथे टुरिस्ट म्हणून ती मस्त फोटोही काढून घेत आहे. पण तिचे हे फोटो कोणी काढले? याचा खुलासा तिने स्वत:च केला आहे. प्राजक्ताने राजस्थानमध्ये फिरताना व्हिडीओ काढला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने लिहिले, “राजस्थानमधील माझे हे फोटो, व्हिडीओ कोणी काढले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर आहे माझा टूर गाईड. जो माझा गाईड कमी आणि फोटोग्राफरच जास्त होता. गेल्या महिन्याभरात काढले नाहीत एवढे फोटो-व्हिडीओ, एका दिवसात त्याने काढले. तर असं होतं एकंदरच चित्र…” Prajakta Mali
प्राजक्ता आगामी ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती ललित प्रभाकरसोबत झळकणार आहे. याद्वारे आता ‘जुळून येती रेशीमगाठी’ची लोकप्रिय जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. Prajakta Mali
हेही वाचा:





