Pragya Thakur : मालेगाव बॉम्बस्फोट खटला; प्रज्ञा ठाकुर विरोधातील जामीन वॉरंटला स्थगिती
Updated On:

Pragya Thakur – 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे.
त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याने विशेष न्यायालयाने जारी केलेल्या जामीन वॉरंटला स्थगिती दिली आहे. प्रज्ञा ठाकूर यांच्याविरोधात 13 नोव्हेंबर रोजी नवीन वॉरंट जारी करण्यात आले होते.
या खटल्यात जामिनावर बाहेर असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापूर्वी आजारपणाचे कारण देत अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मागितली आहे. एनआयए कोर्ट सध्या 16 वर्षे जुन्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात असून आरोपींचे अंतिम जबाब नोंदवत आहे.





