Pradeep Purnekar : खळबळजनक ! प्रदीप पूर्णेकरांनंतर त्यांच्या पुतणीला जीवे मारण्याची धमकी
प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या निधनानंतर संपूर्ण पूर्णेकर कुटुंब अद्यापही खोल धक्क्यात असतानाच, आता या कुटुंबावर आणखी एका मोठ्या संकटाचे सावट पसरले आहे.

Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या निधनानंतर संपूर्ण पूर्णेकर कुटुंब अद्यापही खोल धक्क्यात असतानाच, आता या कुटुंबावर आणखी एका मोठ्या संकटाचे सावट पसरले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक यांनी आज पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. मात्र, या सांत्वन भेटीदरम्यान समोर आलेल्या एका धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पुतणीला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. खुशबू पूर्णेकर हिने स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर ही गंभीर बाब उघड केली.
खुशबूच्या सांगण्यानुसार, तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक निनावी आणि भयानक संदेश आला आहे, ज्यामध्ये स्पष्ट शब्दांत “प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तूच आहेस,” असा इशारा देण्यात आला आहे.
भरदिवसा आणि कुटुंबीय शोकाकुल असताना थेट सोशल मीडियावरून मिळालेल्या या धमकीमुळे कुटुंबातील भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून, आता या प्रकरणाला (Pradeep Purnekar) एक गूढ आणि थरारक वळण मिळाले आहे. प्रताप सरनाईक यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीने सायबर आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लावण्याचे संकेत दिले आहेत.






